Five CRPF jawans injured in a grenade attack in Anantnag district's Wanpoh (J&K), being treated in a hospital.



( गणेशपेठ नागपूर शहर) येथे प्रकाश मेजर* drink
and drive चा आरोपी यांस पोलीस ठाणेस घेवून जात असतांना आरोपीने रामझुल्या खाली
गाडी थांबवून पोलीसाला डोक्यावर हेल्मेट ने व दगडाने मारहाण करून गाडी घेवून पळून
गेला ह्या हल्ल्यात बाहतूक पोलीस श्री प्रकाश बारंगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
वाहतुकीचे
नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यातही पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा
कुठलाच धाक उरलेला नाही, मागील काही दिवसातच अश्याच प्रकारचा हल्ला विलास शिंदे
ह्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी करण्यात आला
होता , शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक
पोलिसांकडून घेण्याच काम करत होते. या दरम्यान त्यांना पेट्रोलपंपावर आलेला
दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. शिंदेंनी तातडीने त्या अल्पवयीन
दुचाकीस्वाराला थांबवले आणि पहिले गाडीची चावी काढून घेतली. त्यांनी अल्पवयीन
दुचाकीस्वाराला परवाना आणि गाडीची कागदपत्रे मागितली. यानंतर त्या दुचाकीस्वाराने
स्वतःच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. अल्पवयीन दुचाकीस्वाराचा २० वर्षांचा भाऊ
अहमद मोहम्मद अली कुरेशी घटनास्थळी आला. त्याने शिंदे यांच्या हुज्जत घालायला
सुरुवात केली. यादरम्यान कुरेशीने स्वतःसोबत आणलेल्या बांबूने विलास शिंदे यांच्या
डोक्यावर प्रहार केला आणि त्यांच्याकडून गाडीची चावी खेचून पळ काढला.
*** मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे यांच्या आई कलाबाई विठोबा शिंदे यांचे त्यांचा राहत्या घरी निधन झाले , त्या 80 वर्षाच्या होत्या. विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यामुळेच आलेल्या अशक्तपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.