BREAKING NEWS

Tuesday, September 13, 2016

मुलाच्या मृत्युच्या धक्क्याने आईनेही सोडला प्राण.

मुंबई (२३ ऑगस्ट) खारमधील एस व्ही रोडवरील मॅक्लॉइड पेट्रोलपंपाजवळ विलास शिंदे कर्तव्य बजावत होते.  शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी
शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. विलास शिंदे २३ ऑगस्ट रोजी हेच काम करत होते. या दरम्यान त्यांना पेट्रोलपंपावर आलेला दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. शिंदेंनी तातडीने त्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला थांबवले आणि पहिले गाडीची चावी काढून घेतली. त्यांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराला परवाना आणि गाडीची कागदपत्रे मागितली. यानंतर त्या दुचाकीस्वाराने स्वतःच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. अल्पवयीन दुचाकीस्वाराचा २० वर्षांचा भाऊ अहमद मोहम्मद अली कुरेशी घटनास्थळी आला. त्याने शिंदे यांच्या हुज्जत घालायला सुरुवात केली. यादरम्यान कुरेशीने स्वतःसोबत आणलेल्या बांबूने विलास शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यांच्याकडून गाडीची चावी खेचून पळ काढला.
कुरेशीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास शिंदे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. डोक्यावर प्रहार झाल्याने शिंदे कोमात गेले होते. गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. बुधवारी शिंदे यांच्या निधनानंतर पोलिसांवरील हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





***  मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले ट्रॅफिक हवालदार विलास शिंदे यांच्या आई कलाबाई विठोबा शिंदे यांचे त्यांचा राहत्या घरी निधन झाले , त्या 80 वर्षाच्या होत्या. विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यामुळेच आलेल्या अशक्तपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रॅफिक बंदोबस्तात असताना हेल्मेट वरून हटकल्याचा कारणावरून विलास शिंदे यांचावर 23 ऑगस्टला हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर 8 दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर वाई तालुक्यातील शिरगाव या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मात्र हा धक्का सहन न झाल्याने विलास शिंदे यांचा आई कलाबाई यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर  4 दिवस त्यांनी अन्न ही घेत नव्हत्या त्यामुळे त्यांचे निधन झाले .

Share this:

Post a Comment

 
Copyright © 2014 Police News . Designed by MB